काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक आई-वडील मुलाला घेऊन आले होते… दहावीला चांगले मार्क्स घेऊन पास झालेला तो पुढे धड काहीच सातत्याने करत नव्हता…
मंडळी कसं आहे ना ‘मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं’ आणि ‘कित्ती लहान वयात एवढे गॅजेट्स मुलांना हाताळता येतात’ याचं विशेषच कौतुक ना… मग या सगळ्यात पैशांची मुलांकडून किंमत कवडीमोल होऊच शकते…
आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे सध्याच्या मुलांच्या स्वभावात निर्माण झालेला उथळपणा… अहो यांची खोलात जाऊन समजून घेणं, जपणं आणि त्यासाठीची ओढ, आवड यातल्या कशाचीच धड ओळख नाही… कारण त्यांची जीवनशैली तशीच घडत चाललीये ना…
मंडळी पहा ना आई – वडिलांशी असलेली नाती त्यात जो खोलवरपणा तुम्ही आम्ही अनुभवला तो आपण आपल्या मुलांना देऊ शकतोय का… नातीपण हाय-हॅलो लेव्हल वर ठेवली जातात हेच ते शिकत आलेत… अभ्यासात सुद्धा नेमका एकच विषय ते खोलवर जाऊन नाही शिकू शकलेत… मग गोडी कुठून निर्माण होणार… कोणत्याही गोष्टीत उत्तम कामगिरी पार पडायची असेल तर त्यात रस निर्माण व्हावा लागतो, त्यासाठी तितका डेडीकेटेडली वेळ द्यावा लागतो, तेंव्हा काहीतरी घडतं… आपल्या आणि आजूबाजूंच्या हातात फुल ना फुलाची पाकळी हाती येईल हे गृहीत धरता येत…
अर्थात आपल्या शिक्षण प्रणालीत आता बदल होत आहेत, नॅशनल एजुकेशन पॉलिसी २०२० जर खरोखर पूर्णपणे आमलात आली तर हे बदलायला हळू-हळू सुरवात होईल… पण अर्थातच कौटुंबिक पातळीवर आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील…. नात्यामध्ये खोलवर प्रेम कसं रुजवल जात हे आपल्या मुलांना देणं… आपल्या पिढीला यासाठी नवीन काही शिकून मुलांना थोडी ना द्यायचंय… फक्त आपल्याला जे सगळं आधीच्या पिढीकडून मिळालं त्यातलं बहुतांश सगळं पुढच्या पिढीला भरघोसपणे द्यायचंय, इतकंच…
मंडळी आणि मग पहा तो उथळपणा बुडबुड्यासारखा विरून जाईल आणि खूप प्रश्न सुटतील…
Mast direction for thought
Very Nice…! Happy Parenting is more a solution than requirement in society today.
Thank you for your response Sir… Being Principal of the school topics for students and parents are always welcome…
धन्यवाद सर… पालकत्व ही कायम चालू राहणारी गोष्ट आहे…आणि साध्य तेच करायचं असलं तरी काळानुरूप त्याकडे पहायचे दृष्टिकोन बदलावे लागतात..