परवा माझी एक मैत्रीण सांगत होती, ती तिच्या बहिणीच्या मुलांना सुट्टीसाठी घेऊन आली… तिची स्वतःची मुलं आणि ही मुलं, घराचं नुसतं गोकुळ झालेलं…
कित्ती निर्मळ प्रेम… प्रेमाची, भावनांची सहज देवाणघेवाण…
मंडळी आमच्या वेळेस सुट्टी म्हटलं की ‘मामाच्या गावाला जाऊ या’ ही संकल्पना होती… तिथे जाऊन दिवस रात्र दंगा मस्ती… घरातच प्रेमाने चार पदार्थ बनवून खायला घातले जायचे… या सगळ्या आनंदात, ना अजून कुठे फिरवून आणायची गरज वाटायची पालकांना, ना हॉटेलिंग जवळचं वाटायचं…
पण आता असंही कधीपण मामाच्या घरी जाता येतं… त्यामुळे त्याचं अप्रूप नाही राहिलं आत्ताच्या पिढीला… आणि ‘सुट्टीला कुठे गेलो होतो’ हा ‘स्टेटसचा’ भाग झालाय… त्यामुळे मोठ्या मोठ्या ट्रिप… मग त्यासाठी म्हणून हेच्या हे शॉपिंग… आणि मग उरला सुरला दिखावा… नावाला २-३ दिवस नातेवाईक, तेही ठराविकच… त्यामुळे दुर्दैवाने मुलांना सगळी नाती माहीतपण नसतात आणि ती सांगता तर त्याहून येत नाहीत… आमच्या आई वडिलांच्या पिढीत कित्ती लांबची असली तरी ते कौतुकाने आणि सहजपणे सांगायचे.…. माझ्या अमक्या तमक्याचा हा तो… आम्हाला खूपदा काळायचीच नाहीत ती नाती, पण ऐकायला गम्मत वाटायची…
अहो आत्ताच्या पिढीला आपण हे सगळं द्यायला विसरतोय का… आपली, माझी माणसं… हा भाग आयुष्यात खूप महत्वाचा हो… कारण त्यातून मिळणार प्रेम विकत मिळत नाही ना मंडळी… मग भले कितीही पैसा असो…
आमच्या लहानपणी कुठे गेलोच नाही असं बऱ्याचदा झालंय… पण तरी आम्ही घरातले बहीण भाऊ एजमेकांबरोबर इतका छान वेळ घालवायचो… आणि कदाचित त्यामुळेच जगाच्या टोकांना राहूनही, आमच्यापैकी प्रत्येकाच्या अडचणीला बाकीचे १००% उभे असतो… भांडतच नाही असे अजिबात नाही… भांडणं तर अशी होतात, महिने महिने आम्ही बोलत नाही… पण मनातून एकमेकांसाठी घट्ट आहोत हे आमच्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे… आई, काकूबरोबर सुद्धा इतका भारी वेळ घालवलाय आम्ही, शब्दात मांडणं अवघडच… पण हे सगळं जास्त करून सुट्टीत व्हायचं…
मंडळी इतकंच म्हणेन, ती उन्हाळ्याची सुट्टी पण या सगळ्यामुळे ‘ऊन ऊन’ वाटायची आम्हाला… आता आजूबाजूला पाहिलं तर असं वाटतं त्यातला ऊन ऊन पणा कमी होत चाललाय आणि ‘उन्ह’ वाढू लागलीयेत…
As usual applicable write up for me and my family as per current situation. Yogita Ma’am thankyou for sharing this.
खरे तर कालच मुलाची शालेय सुट्टी सुरु झाली आणि आम्हीपण त्याला हेच सांगत होतो. पण बिचारी आताची पिढी हो बिचारीच कारण ना धड पालकांना वेळ ना मुलांना गॅझेट्सच्या दुनियेतून बाहेर यायला वेळ…या कारणास्तव कुठल्याच नातेवाईकांची ना भेट ना कधी कार्यक्रम उपस्थिती आणि जर जबरदस्तीने नेलेच तर विचारतात घरी कधी जायचे नाहीतर मोबाईल दे.
बालपणीच्या काय आठवणी सांगतील हे पुढच्या पिढीला…देवच जाणो!
तुमच्या वरील मेसेज बद्दल मनोलया आभारी आहे…
तुम्ही मुद्द्यांची छानच नोंदणी केली आहे हे दिसून येत आहे… तसेच तुम्ही म्हणता हे चित्र खरे जरी असले तरी ते बदलावे हाच या ब्लॉग चा उद्देश आहे… आपल्यासारखं त्यांचं जग नाही असू शकणार पण त्याच्या जवळ त्यांना आणण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल हे नक्की…
purvi mazya ghari pn amhi sarv bavande sutti mdhe ektra yoycho v khup maja kroyho tya mule amchyatil apulki, prem ajunhi tikun aahe.pn attachya pidhila he Sagal anubhvayla milal nahiye tyachi khant vatate. Very nice blog.
अनुराधजी धन्यवाद! मुळात प्रेम आणि आणि त्याची खोली मुलांना अनुभवता आली की मग नाती जगणं सहज होईल त्यांच्यासाठी,…
छान संकल्पना मांडली आहे.
सुरेख…
धन्यवाद सर!!! काही नवीन विषय सुचवल्यास त्यांचे आमच्याकडून स्वागतच होईल,…
Very true kharach aapan he sagala visarat chalaloy, nusta dikhava aahe aatacha jag.
सर तुमच्यासारख्या मंडळींकडून वेळोवेळी येणाऱ्या या आणि अशा नोंदींमुळे लिखाणाचे बळ वाढते…
ही घट्ट नाती सर्वानाच मानसिक आधार, आनंद आणि दीर्घायुष्य देत होती. आताशा मात्र ही सगळीच विण उसवत चाललीय.
तुमच्या या नेमक्या टिप्पणी बद्दल धन्यवाद! अहो ही वीण घट्ट करण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करूयात की☺️!!!…
धन्यवाद सर!!! तुम्ही काही नवीन विषय सुचवल्यास त्यांचे आमच्याकडून स्वागतच होईल,…