काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले होते… प्रोब्लेम दिसायला साधाच होता… मुलगा खोटं बोलून मित्र-मैत्रिणीबरोबर फिरायला बाहेर जात होता… साधारण वय 14-15 त्याचं…
मंडळी मुळात खोटं बोलायची किंवा लपवायची वेळ का येत असेल हो कोणावरही… जेंव्हा त्याला करकचून बांधून ठेवलंय… बंधनं कोणालाच आवडत नाहींत… वय किंवा आयुष्याचा कोणताही टप्पा असो…
एक आई-वडील किंवा शिक्षक म्हणून आपल्या डोळ्यासमोर इतकंच असतं की त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे असे वर्तन घडू नये किंवा त्यांना अशा कोणत्याही सवयी लागू नयेत ज्यामुळे त्यांच्या आयुष्यच नुकसान होईल…
पण त्यासाठी त्यांना सात पडद्यांच्या आत नजरबंद ठेवणं आजिबात गरजेचं नसतं… ते थोडी ना गुन्हेगार असतात आपण त्यांच्याशी पोलिसी खाक्याने वागायला… हे टाळण्यासाठी खूप साध्या गोष्टी करता येतात हो…
1. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट फक्त मुलांनीच आपल्याला त्यांच्या गोष्टी शेअर कराव्यात हे न घडता आपणही त्यांच्याबरोबर चार गोष्टी शेअर कराव्यात, त्यामुळे त्याला गप्पांचे आणि सहज स्वरूप येतं… आणि त्यातून आणखी महत्वाचं म्हणजे बाहेरच्या जगाची समज आपोआप वाढत जाते…
2. मुलांना रेड हँड पकडणं, ओरडणं, ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे… यातून खरोखर काही हाती येत नाही… उलट मुलं जास्त काळजी घेऊन सफाईदारपणे खोटं बोलू लागतात…
3. सध्याच्या पालकांकडून सहज होणारी आणखी एक चूक- सध्याची मुलं जास्त हुशार आणि स्मार्ट आहेत… मग ती खूप मॅच्युर आहेत असं आपल्याला वाटू लागतं… आणि मग त्यांच्याकडे आमचं लांबून लक्ष आहे असं म्हणतं राहतात पालक… आणि दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते…
4. मुलांच्या मित्र मैत्रिणीशी तुमची जवळची आणि सहज नाती हवीत… कोण चांगलं वाईट हे ठरवून मुलांवर लादण्यासाठी नव्हे तर त्याप्रमाणे आपले मुलांशी संवाद काय असावेत हे ठरवण्यासाठी…
कसं आहे ना मंडळी सिंहाला बांधून ठेवता येत नाही… आणि त्यामुळेच त्यांची स्वतःची अगदी चालण्यापासून ते जगण्याची अशी खास ढब असते… त्याचा बछडा थोडा मोठा झाला की त्याला शिकार करायला शिकवून जबरदस्तीने त्यांचे वडील कबिल्यातून हाकलून देतात आणि मग त्याला त्याचं स्वतंत्र कुटुंब आणि टेरेटरी निर्माण करावी लागते… या उलट बांधून ठेवलेल्या कुत्र्याला मोकळं सोडलं की ते पिसाटल्यासारखं सुटतं… त्याला कशाचेच भान राहत नाही…
आता तुम्ही ठरवा तुमच्या पोटी आलेलं कोणसारखं घडवावे… बंधन नकोत असं नाही, पण मोकटपणा पण नको… याचा मध्य सहज, सुशील नात्यातून साध्य करता येतो… आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आणि नात्यात…