मनोलयाच्या वतीने आम्ही काही सत्र घेत असतो… योगायोगाने कोविड पूर्व आणि दरम्यानदेखील मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम हा विषय चर्चेत आला…
आणि त्यातून बरेच मुद्दे समोर आले… त्यातला आश्चर्य निर्माण करणारा मुद्दा होता तो म्हणजे लॉक डाऊन मध्ये जेंव्हा मुलं घरात होती, तेंव्हा पालकांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलांची कमी झालेली चिंतेची पातळी (anxiety level) … कारण सहज आणि साधं आहे… त्यांना शाळा, अभ्यास मग शालाबाह्य उपक्रम (extra curricular) यासाठी कोणतीही धावपळ करायची नव्हती… अहो बघा ना एरवी आपल्या आजूबाजूचे कित्ती जण सांगतात मुलांचा हा क्लास, तो क्लास, त्यांना नेणं-आणणं यात दमछाक होतेे
अगदी… अरे पण मग जे स्वतः परफॉर्म करतायत त्यांचं काय होतं असेल… आणि मग निश्चितच घरी आल्यावर सगळेच अर्धमेले…
निश्चितच खेळ,संगीत,गाणं या ऍक्टिव्हिटीच मुलांनी एक्सपोजर घेतलंच पाहिजे… याला २ कारण आहेत… एक म्हणजे यातून एखादा छंद जोपासला जातो आणि तो आयुष्यात खूप छान सोबत करतो… आणि वयानुरूप मुलं सोशल, कॉन्फिडन्ट बनत जातात… मंडळी पण अर्थातच ज्यातून त्यांना आनंद मिळतोय त्याच ऍक्टिव्हिटी त्यांना करू देत… उगा बाकीचे करतात म्हणून माझ्या मुलाने चार केल्याच पाहिजेत हा आग्रह योग्य नाही…
मुलं साधारण २-३ वर्षाचे झाले की त्याचे एक्सपोजर चालू करावे… ‘ट्रायल अँड एरर’ हा चांगलाच ऑप्शन आहे.. आणि मग आपणही इंटरेस्ट घेऊन त्यांचं एक्सपोजर अजून कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्यावं… जसं एखादा खेळ आवडत असेल त्याच्या मॅचेस मुलांबरोबर पाहणं, संगीत असेल तर त्याचे काही प्रोग्रॅम्स अटेंड करणं… पण बरं का हे सगळ करताना मुलांचा संयम ताणू नका… कारण जोर जबरदस्तीने रस निघून जातो आणि मग पाट्या टाकून असंही काय विशेष हाती येणार हो???..
मंडळी आणि मग अशामुळे इंटरेस्ट टिकण अवघड होऊन जातं…
आपलं मूल अगदीच अट्टाहास करून ती ऍक्टिव्हिटी बंद करायचं म्हणत असेल तर बंदच करावी पण तत्पूर्वी काही प्रयत्न करावेत, जसे…
१. मुलाशी बोलून पाहावं नेमकी कुठे आणि काय मेख आहे, आणि न्यायाधीश न बनता त्यांची बाजू समजून घ्यावी…
२. क्लास मध्ये जाऊन पाहावे आपल्या मुलाला नेमकी कुठे आणि काय अडचण येतीये…
३. एखाद्या त्याच्या मित्राबरोबर त्याचा क्लास चालू करावा…
४. क्लासचे मार्गदर्शक, आजूबाजूची मुलं ही अडचण असल्यास त्यानुसार काही वेगळे निर्णय घ्यावेत..
५.आणि हे सगळं करत असताना मुलाशी चर्चा, त्यांची मतं गृहीत धरणं निश्चित गरजेचे आहेच…आणि मुळात त्यांच्यावर ‘विश्वास’ ठेवणं..
विश्वास या शब्दाचा आवर्जून वर उल्लेख केला… कधी कधी त्यांच्या या ऍक्टिव्हिटीजमधून त्यांचं करिअर घडू लागत… पण आपल्याकडे ‘मिडल क्लास विचारसरणी’ची मूळ इतकी रुजली आहेत… ‘हे सगळं ठीक आहे पण अभ्यासाला पर्याय नाही’ हे वाक्य आजही खूप घरांमधून ऐकू येतं… मंडळी अशा वेळी आपण मुलांचा विश्वास संपादन करायला किंवा त्यांच्यावर तो ठेवायला कमी पडत असतो हे नक्की… मग आपलं बॉंडिंग कमी पडतंय की कम्युनिकेशन की अजून काही हे नक्की पहा… कारण यातून घडेल एवढंच की एखादा रोनाल्डो, धोनी, किंवा झाकीर हुसेन इच्छा नसताना पण नोकरीमध्ये बढती साठी लढत राहील…
मंडळी या सगळ्याला अजून एक कंगोरा नक्कीच आहे… कसं असतं ना अहो मुलांना त्यांची अशी स्पेस मिळूच शकते हे ते लहानपणापासून शिकले तर आणि तरच ते पुढे इतरांनाही स्पेस देणार… अहो कोविड मुळे का होईना रेस मध्ये धावणाऱ्या घोड्याला आराम मिळाला, आता तुम्हीच ठरवा त्यांना परत रेस साठी उभं करणार आहात की घोडा चालवणारा स्वार घडवणार…
creative ideas.
Very nice blog.
Thank you dear… Active readers like you always encourage me to write…