माझ्याकडे महेश समुपदेशनासाठी आला होता. त्याच्या एकंदरीत बोलण्यातून त्याची भावनिक आणि वैचारिक बिकट अवस्था जाणवत होती. एकंदरीत वैमनस्याकडे वाटचाल चालूझाली होती. त्याच्याबरोबर समुपदेशनाची सत्र चालू झाली. सुरवातीला त्याला प्राणायाम, ओंकार आणि ध्यान (meditation) करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या. पण काहीकेल्या त्याचे ध्यानासाठी चित्त स्थिर होईना. आणि या गोष्टीने तो अधिकच अस्वस्थ होऊ लागला.
मी त्याला म्हटलं अरे अशा प्रकारे ध्यान लागत नाहीये तर हरकत नाही, वेगळ्या प्रकारे करू आपण ध्यान. त्याला विचारलं, तुझे तुझ्या बायकोबरोबर शारीरिक संबंध कसे आहेत. त्यातून तू आनंद उपभोगतोस का? महेश म्हणाला बरे आहेत आमचे संबंध. समागमातून आनंद घ्यायला काय नवीन लग्न थोडी आहे, लग्नाला ९ – १० वर्ष झाली कि आता. आणित्यातून आनंद काय घ्यायचा असतो. दोघांच्या शरीराची गरज आहे ती.
मग मी त्याला म्हटलं तुझं चित्त स्थिर करण्यासाठी तुमच्यातले शारीरिक संबंध तुला निश्चित मदत करतील. तो आश्चर्यानेच माझ्याकडे पाहत होता. मी त्याला म्हटलं हे पहा आपण ध्यानकरतो तेंव्हा नेमके काय घडत असते. साधे उदाहरण, जेंव्हा आपण डोळे मिटून आपल्या श्वासाकडे आपले लक्ष केंद्रित करतो, तेंव्हा आपण आपल्या बाकी संवेदनापासून स्वतःलाअलिप्त करतो. आपल्या बरोबर घडलेल्या भूतकाळातील गोष्टी त्याच्याबरोबर निर्माण झालेल्या भावना, विचार तसेच भविष्यासाठी असणारी चिंता यापासून स्वतःला म्हणून वेगळेकरतो. थोडक्यात आपल्या मनाला वर्तमानात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून मन आणि शरीराला आराम मिळतो. आणि परत चालू होणारी विचार प्रक्रिया आणि भावनासकारत्मक जाणवतात. कारण या क्रियेत तुम्हाला भौतिक जगाचा विसर पडतो आणि त्या प्रत्येक क्षणात तुम्ही स्वतःला अनुभवत असता. आणि त्या नंतर स्वतःचे, स्वतःच्या विचारांचे, भावनांचे त्रयस्थ माणूस म्हणून निरीक्षण करू शकता.
याचप्रमाणे जेंव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर संभोग साधता तेंव्हा तुम्ही तुमचे लक्ष पूर्णपणे या क्रियेत गुंतवले तर असेच काही अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही संभोगात एकमेकांनाकाय देताय-घेताय आणि मनापासून तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला मिळणारे सुख, तसेच मी माझ्या जोडीदाराची / चा आणि समागमात माझं सगळं मी त्याला देत आहे, याभावना तुम्हाला आत्यंतिक आनंद देतात. आणि मग या क्रियेत भौतिक जगापासून, इतर संवेदनांपासून तुम्ही अगदीच सहज अलिप्त होता. आणि परिणामतः तुमचा मानसिक,शारीरिकताण कमी होतो. त्याचे सकारत्मक परिणाम म्हणजे करत असलेल्या इतर कामांमध्ये लक्ष केंद्रित करणे सोप्पे होते. आत्मविश्वास वाढतो. आनंदी आणि उत्साही वाटते.
उगाच आपल्या संस्कृतीत समागमाला महत्व दिलेले नाही. आपले साहित्य, जुन्या लेण्या, पौराणिक कथा संभोगाबद्दल खूप काही सांगतात. कारण एखाद्याने आपल्याबरोबर शारीरिकसंबंधासाठी दर्शवलेली संमती आणि आपला केलेला स्वीकार या दोन गोष्टी तुमच्यात सकारात्मकता निर्माण करत असतात. आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद तुमचे उत्तम स्वास्थ्यआणि आध्यत्मिक प्रगती यासाठी मदतच करते. तुम्ही नियमितमाणे समागम साधत असाल तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. निश्चितच तुम्हीकोणाबरोबर,कसा, केंव्हा तो साधत आहात यावर ते अवलंबून आहे.
मंडळी पण ध्यानाद्वारे केलेली साधना आणि संभोगातून घडणारे ध्यान यांच्यात साम्य जरी दिसत असले तरी दोन्हीचे उर्ध्वगामी उद्देश वेगळे आहेत हे लक्षात घेतले पाहिजेत. कारणध्यानाद्वारे केलेली साधना ऊर्जा निर्मिती करते. आणि समागम हे ती ऊर्जा व्यक्त करण्याचे, त्याची देवाणघेवाण करण्याचे साधन.
मी महेशला शारीरिक संबंधातून ध्यान अवस्थेचा अनुभव घ्यायला सांगितला. प्राथमिक ध्यान अवस्था आणि समागमातून मिळणारे फायदे जरी एकच असले, तरी या दोन्ही क्रियाआणित्याचे अंतिम परिणाम भिन्न आहेत हे निश्चितच आहे. त्याचप्रमाणे ज्यांची लग्न झालेली आहेत, व नियमित ज्यांचे शारीरिक संबंध आहेत त्यांच्यासाठी समागमातून या गोष्टी मी सुचवण्याचाप्रयत्न केलेला आहे. हा उपाय सुचविण्याचे कारण म्हणजे आपले विचलित चित्त ध्यानासाठी स्थिर करणे हे तितके सहज नाही. पण समागमामधून हे साध्य करणे तुलनेने सोप्पे. त्यामुळेसंभोग या गोष्टीला क्षुल्लक न समजता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, ऊर्जा देण्या घेण्याचा उस्फुर्त स्रोत म्हणून पहा.